health benefits of pomegranate peel

डाळिंबाच्या साली आहेत खूपच गुणकारी, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

तब्येत पाणी लाइफ स्टाइल

डाळिंब त्याची विशिष्ट चव आणि त्याच्या आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायद्यांसाठी ओळखले जातात. आपण नेहमीच डाळिंबाच्या बिया फार आवडीने खातो, त्याचे अनेक फायदे आहेत. परंतु डाळिंबाची लाल रंगाची कडक त्वचा अनेकदा टाकून दिली जाते. मात्र, डाळिंबाच्या बियांप्रमाणे त्याची साल सुद्धा खूप गुणकारी आहे, हे आपल्याला माहित नसते. डाळिंबाच्या सालीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत, ते आपण जाणून घेऊया:

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुरुम आणि पुरळांच्या समस्या दूर करतात
डाळिंबाच्या सालीत उपचारक्षमता (healing praperty) असते, ज्यामुळे डाळिंबाची साले प्रभावीपणे मुरुम आणि पुरळांशी लढू शकतात. डाळिंबाची साले अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात आणि बॅक्टेरिया आणि इतर संक्रमण दूर ठेवण्यास मदत करतात. मुरुमांपासून सुटका होण्यासाठी येथे काही हर्बल उपाय आहेत.

डाळिंबाची साले उन्हात वाळवून नंतर त्याची ग्राइंडर किंवा मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवता येते. या पावडरमध्ये लिंबाचा रस किंवा गुलाब पाणी टाकून पेस्ट बनवा आणि ती तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा, विशेषत: मुरुमांवर. थोडा वेळ सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

त्वचेचे तारुण्य आणि सौंदर्य वाढवण्यास उपयुक्त
डाळिंबाची साले तुमच्या त्वचेतील कोलेजनचे (collagen) विघटन रोखतात, परिणामी पेशींच्या वाढीस उत्तेजन मिळते, जे वृद्धत्वाची चिन्हे आणि सुरकुत्या प्रभावीपणे रोखण्यास मदत करतात.

  • त्वचेचे तारुण्य : दोन चमचे डाळिंबाच्या सालीची पावडर घ्या आणि त्यात थोडे दूध घाला. तेलकट त्वचा असल्यास दुधाऐवजी गुलाब पाणी घाला आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत तशीच ठेवा. नंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून किमान दोनदा पावडर वापरून पहा.
  • नैसर्गिक मॉइश्चरायझर : दोन चमचे डाळिंबाच्या सालीची पावडर घ्या आणि थोडे दही मिसळून त्यातून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 10 मिनिटे ठेवा. नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि आपली त्वचा प्रदूषकांपासून सुरक्षित राहते. हे त्वचेचे पीएच बॅलन्स पुनर्संचयित करते.
  • प्रभावी स्क्रब : दोन चमचे डाळिंबाच्या सालीची पावडर घ्या, त्यात एक चमचा ब्राऊन शुगर घाला. पेस्ट तयार करण्यासाठी, एक चमचा मध, एक चमचा एवोकॅडो तेल किंवा आपल्या आवडीचे कोणतेही इसेन्शिअल ऑइल घाला आणि चांगले मिसळा. याने आपला चेहरा स्क्रब करा आणि मसाज करा. स्क्रब केल्यानंतर टोनर आणि मॉइश्चरायझर वापरण्यास विसरू नका. डाळींबाची साले चेहऱ्याच्या स्क्रबच्या रूपात वापरल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील मृत त्वचा (dead skin), ब्लॅक आणि व्हाईट हेड्स काढून टाकण्यास मदत करतात.
  • नैसर्गिक सनस्क्रीन : डाळिंबाच्या सालामध्ये सूर्य-अवरोधक घटक असतात, जे आपली त्वचा हानिकारक UVA आणि UVB किरणांपासून वाचवू शकतात. डाळिंबाच्या सालींची पावडर तुमच्या लोशन किंवा क्रीममध्ये मिसळा, शक्यतो घर सोडण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर लावा. वैकल्पिकरित्या, जर तुम्ही नैसर्गिक सनस्क्रीन वापरू इच्छित असाल तर तुम्ही काही इसेन्शिअल ऑइलमध्ये पावडर मिसळू शकता आणि चेहऱ्यावर लावू शकता.

डोक्यातील कोंडा आणि केस गळण्यास प्रतिबंध

डाळिंबाची साले केस गळणे थांबवतात आणि डोक्यातील कोंडा टाळण्यास मदत करू शकतात. केसांच्या तेलात डाळिंबाच्या सालीची पावडर मिसळा. ते तुमच्या केसांच्या मुळांवर लावा आणि मसाज करा. दोन तासांनंतर आपण आपले केस सौम्य शॅम्पूने धुवू शकता किंवा आपल्या सोयीनुसार रात्रभर देखील ठेवू शकता.

घशाच्या खवखवीवर उत्कृष्ट घरगुती उपाय
जर तुमचा घसा खवखवत असेल किंवा तुम्ही टॉन्सिलच्या दुखण्याने ग्रस्त असाल आणि तात्काळ आराम हवा असेल तर डाळिंबाच्या सालीची पावडर तुम्हाला मदत करू शकते.

सूर्यप्रकाशात वाळवलेली डाळिंबाची साले मूठभर घ्या आणि पाण्यात उकळा. हे मिश्रण गाळून घ्या आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. या पाण्याने गार्गल करा, यामुळे घसा खवखवणे आणि टॉन्सिलच्या वेदनांपासून आराम मिळेल.

हृदयरोगापासून संरक्षण
यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे धोकादायक आणि जीवघेण्या हृदयरोगाशी लढण्यास मदत करतात. हे कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करते, तणाव कमी करते आणि हृदयाचे आरोग्य पुनर्संचयित करते. ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि रक्तदाब देखील कमी करतात.

कसे वापरावे : एक चमचा डाळिंबाच्या सालीची पावडर एका ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि हे मिश्रण रोज प्यायल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारेल. तथापि, योग्य आहार आणि नियमित व्यायामासह दोन दिवसातून एकदा हे पेय पिल्यास आपल्या हृदयाचे आरोग्य पुनर्संचयित करण्यात मदत मिळेल.

दंत  स्वच्छता
डाळिंबाची साले दंत समस्यांना तोंड देण्यास मदत करतात. जसे की दुर्गंधी, हिरड्यांना आलेली सूज, तोंड येणे.

कसे वापरावे: एक ग्लास पाण्यात एक चमचा डाळिंबाच्या सालीची पावडर घाला आणि चांगले मिसळा. दुर्गंधी दूर करण्यासाठी या मिश्रणाने दिवसातून दोनदा गार्गल करा. डाळिंबाच्या सालीच्या पावडरने हिरड्यांना मसाज केल्यास हिरड्यांची सूज आणि रक्तस्त्राव असे हिरड्याचे आजार टाळता येतात. या पावडरमध्ये एक चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा आणि दात किडणे टाळण्यासाठी हे मिश्रण बोटांनी दातावर लावा आणि थोडा वेळ ठेवा. 10 मिनिटांनंतर आपले तोंड पाण्याने स्वच्छ धुवा.

हाडांचे आरोग्य
बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, डाळिंबाची साल हाडांची घनता कमी होणे कमी करते. याने हाडांचे आरोग्य वाढते आणि रजोनिवृत्तीनंतर ऑस्टियोपोरोसिस सुरू होण्यास प्रतिबंध होतो.

कसे वापरावे: दोन ग्लास कोमट पाण्यात डाळिंबाच्या सालीची पावडर घाला आणि चांगले मिक्स करा. त्याची चव अधिक चांगली होण्यासाठी तुम्ही एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालू शकता. हाडांना बळकट करण्यासाठी हे मिश्रण रात्री प्या.

आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत

डाळिंबाच्या सालामध्ये टॅनिस (tannis) असतात, जे आतड्यांची जळजळ, मूळव्याध सूज, आतड्यांसंबंधी आवरण घट्ट करणे, अतिसारादरम्यान रक्तस्त्राव थांबवणे आणि पचन सुधारण्यास मदत करतात.

अर्धा कप डाळिंबाची साल पाण्यात 30 मिनिटे भिजवून ठेवा. त्या साली मऊ झाल्या की ब्लेंडरमध्ये टाका, त्यात एक चमचा जिरे, तीन-चतुर्थांश कप ताक, थोडे रॉक सॉल्ट घाला आणि हे सर्व ब्लेंड करा. मुळव्याध, आतड्यात जळजळ किंवा पचन समस्यांशी लढण्यासाठी हे मिश्रण आठवड्यातून किमान तीन वेळा प्या. जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल किंवा शौचातून रक्त येत असेल तर या लक्षणांपासून अराम मिळवण्यासाठी तुम्ही दिवसातून तीन वेळा ते पिऊ शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत