नागपूर : इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी राज्यात 65 नवी वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दहा–बारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी […]
टॅग: PALGHAR
वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती द्या – पालकमंत्री गणेश नाईक
मुंबई : वसई विरार महापालिका क्षेत्रातील 13 मुख्य रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्याच्या कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने गती द्यावी, असे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. कामास मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) वसई विरार महापालिका हद्दीत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पासंदर्भात मंत्री नाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त ए.के. […]
जेवणात चिकन मागितल्याने राग अनावर, आईने बेदम मारहाण केल्याने चिमुकल्याचा मृत्यू
पालघर : पालघरमधील घोडीला कॉम्प्लेक्स परिसरातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जेवणात चिकन हवे अशी मागणी केल्यामुळे रागाच्या भरात आईने आपल्या सात वर्षांच्या मुलाला लाटण्याने बेदम मारहाण केली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पतीपासून वेगळी राहत होती. ती आपली दोन मुले आणि दोन बहिणींसोबत घोडीला […]
खावडा प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा – वन मंत्री गणेश नाईक
मुंबई : पालघर जिल्हयातील खावडा अतिउच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या कामामध्ये प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना तुलनात्मकरित्या जास्त असलेला मोबदला देण्यात यावा. स्थानिक प्रशासन आणि संबधित कंपन्यांनी समन्वयाने प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील खावडा अतिउच्च दाब विद्युत वाहिन्यांच्या उभारणीतील दर निश्चिती व अन्य विषयांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक पार […]
विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर
मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. विरार ते अलिबाग बहुद्देशिय मार्गिका प्रकल्पाच्या एकूण 126.06 किलोमीटर लांबीपैकी पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली दरम्यानच्या 96.410 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात महामंडळामार्फत बांधा वापरा आणि […]
समृद्ध शिक्षणव्यवस्थेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर व शिक्षक-पालक सुसंवाद महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालघर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, दुर्वेस येथे शाळाभेटी दरम्यान केले. नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ च्या प्रारंभाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत नवप्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांचे औपचारिक […]
पालघर येथील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक
मुंबई : पालघर जिल्ह्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची सुधारण करण्यात येऊन रस्ते चांगल्या दर्जाची करण्यात येतील. दाभेरी ते बोपदरी या राज्य मार्गावर २.९ किलोमीटर आंतराच्या रस्ता सुधारणा कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच दाभेरी – राहूळ – सागपाणी या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुरू असून दोन्ही रस्ते मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात […]
पालघरमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार, ४५ वर्षीय आरोपीला सुरतमधून अटक
पालघर : पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींपैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. याप्रकरणी गुजरातमधील सुरत येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कोठडीत त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पालघरमधील […]
वाढवण बंदरामुळे पालघर परिसराचे आर्थिक चित्र बदलणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पालघर : देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मच्छिमार बांधवांचे मोठे योगदान आहे. वाढवण बंदर जगातील सर्वात खोल व मोठ्या बंदरांपैकी एक महत्त्वपूर्ण बंदर होणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचे आर्थिक चित्र बदलणार आहे. आता हा परिसर रेल्वे व महामार्गांशीही जोडला जाणार असून यामुळे या परिसरात नवनवीन व्यापार सुरू होतील. या बंदराचा लाभ महाराष्ट्राबरोबरच या भागातील स्थानिकांना […]
पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू
मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. एक्स्प्रेस ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर ही एक्सप्रेस मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. […]










