Bus Accident At Waghoba Ghat In Palghar, 15 Injured
महाराष्ट्र मुंबई

पालघरमधील वाघोबा घाटात बसचा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी

पालघर : पालघरमधील वाघोबा घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिकहून आलेली ही बस थेट 20 फुट दरीत कोसळली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीची भुसावळ-पालघर रातराणी बस नाशिकवरून पालघरला येत होती. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास वाघोबा घाटात एका वळणावर वाहन चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस दरीत कोसळली. त्यामुळे बसमधील किमान 15 प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, बसचा चालक मद्यधुंद असल्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत