Pregnant woman did not get timely treatment, twins died in Palghar

दुर्गम भागातील व्यथा! गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू

महाराष्ट्र मुंबई

पालघर : एका गर्भवती महिलेला वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने नवजात जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी पाडे आणि दुर्गम भागातील मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न समोर आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी येथील वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी झोळीतून तीन किलोमीटर अंतरावरील दवाखान्यात जावे लागले, यावेळी वेळेत सुविधा न मिळाल्याने त्यांच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला.

वर्षानुवर्षे येथील ग्रामस्थ रुग्ण आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी कापडी झोळ्यावर अवलंबून आहेत. वंदना यांनाही प्रसूती वेदना होत असताना भर पावसात असेच न्यावे लागले, मात्र, वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने त्यांच्या जुळ्या बाळांचा मृत्यू झाला. अनेक आदिवासी भागात, गर्भवती स्त्रिया प्रसूतीची तारीख जवळ आल्याने ज्यांचे घर हॉस्पिटलच्या जवळ आहे अशा नातेवाईकांकडे राहायला जातात. पण वंदना यांना हे शक्य झाले नाही आणि त्यांनी आपली मुले गमावली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत