पुणे : पुण्यातून आत्महत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे नसल्याने नवऱ्याने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्यामुळे एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून देत प्रकरणाचा तपास सुरू केला. शिवानी गोपाल शर्मा (वय 20) असे मृत महिलेचे नाव आहे. शिवानी गेल्या […]
Tag: suicide
कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं
सांगली : सांगलीतला तरुण पैलवान सूरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करुन आस्मान दाखवणाऱ्या सूरजने अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होते आहे. सूरज निकमचा […]
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या
मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर […]
अभिनेत्री दीपा हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ
चेन्नई : दीपा नावाने ओळखली जाणारी तामिळ अभिनेत्री पॉलीन जेसिका हिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ती 29 वर्षांची होती. ‘थुप्परीवलन’ आणि ‘वैथा’ मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली आंध्र-आधारित तमिळ अभिनेत्री रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी चेन्नईतील तिच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. दरम्यान, तिने तिच्या डायरीत एक संशयास्पद संदेश […]
दु:खद! यवतमाळमध्ये एका महिन्यात 48 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यवतमाळ : यवतमाळमध्ये ऑगस्ट महिन्यात ४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येगे यांनी तात्काळ समिती स्थापन केली आहे. या दु:खद मृत्यूंची आकडेवारीही त्यांनीच सांगितली आहे. आकडेवारीनुसार, या वर्षी सप्टेंबरपर्यंत एकूण 205 आत्महत्येची प्रकरणे नोंदली गेली असून, त्यामुळे राज्य सरकारच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एका स्थानिक शेतकऱ्याने सांगितले की, […]
मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट सरस्वती दासची आत्महत्या, गेल्या 15 दिवसांतील चौथी घटना
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत तीन मॉडेल्सच्या मृत्यूचे गूढ उकलत नव्हते, तोच आता आणखी एका मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टने आत्महत्या केली आहे. या मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टचा मृतदेह कोलकाता, पश्चिम बंगालमधील तिच्या घरातून सापडला आहे. या मॉडेलचे नाव सरस्वती दास आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती धडपडत होती, असे सांगितले जात आहे. पंधरा […]
मुंबईत खळबळ! प्रियकराने नंबर ब्लॉक केला, 20 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…
मुंबई : प्रियकराने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले, म्हणून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यात कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर मुलाने या मुलीचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक झाल्याने दुखी होऊन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. प्रणाली लोकरे असे मृत तरुणीचे नाव आहे. […]
प्रेमविवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका तरुणाने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. 22 वर्षीय शुभम केशरवानी याने प्रेमविवाह केला होता, असे सांगितले जात आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही सापडली असून, त्यात मृताने पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. सुसाईड नोटच्या आधारे शुभमच्या कुटुंबीयांनी तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]
वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचले, नंतर धगधगत्या सरणात उडी घेतली…
नागपूर : एका वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुही तालुक्यातील किन्ही येथे मंगळवारी घडली. आत्माराम मोतीराम ठवकर(८०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते. आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते वारकरी संप्रदायाचे होते. आत्माराम यांनी रात्रभर मंडईत नाटक बघितले. त्यानंतर मंगळवारी पहाटे […]
एकाच कुटुंबातील 5 जणांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतून सर्व जण बचावले असून डायमंड वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अवधान परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास कौटुंबिक कलहांना कंटाळून […]