मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली काल पुण्यात पोहचली आहेत. पुण्यात त्यांनी शांतता रॅलीला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांवर आरोपही केले. मात्र, शांतता रॅलीला संबोधित केल्यानंतर मनोज जरांगे यांना भोवळ आली आहे, त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मनोज जरांगे म्हणाले, शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो, आमच्या मागण्या पूर्ण […]
Tag: marathi news
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; चार गंभीर
जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. सातही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले आहेत. ही दुर्घटना जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली. मृतांची […]
सरकार-बिरकारच्या भरंवशावर राहू नका, नितीन गडकरींचा शेतकऱ्यांना सल्ला!
नागपूर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. अनेक सभा आणि कार्यक्रमांमधून नितीन गडकरींनी स्टेजवर केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी केली आहे. अनेकदा तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारचे कान देखील टोचले आहेत. सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना गडकरी मागेपुढे पाहात नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे. या पार्श्वभूमवीर नितीन गडकरींचं भाषण म्हणजे […]
मंत्रिमंडळ निर्णय, १६ जुलै : औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरताबाबत सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती!
मुबई : उद्धव ठाकरे सरकारने अल्पमतात असताना शेवटच्या दिवशी घेतलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यासोबतच नवी मुंबई विमानतळाला देखील दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, हे निर्णय नवीन सराकर फिरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर आज […]
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण..
परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे […]
नांदेडमध्ये खळबळ! २४ तासात दोन तरुणांची निर्घृण हत्या
नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. […]
धक्कादायक खुलासा : चीनकडून 2015 मध्येच ‘कोरोना विषाणू’ शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार, अमेरिकेला मिळाले पुरावे
बीजिंग : चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार २०१५ मध्येच केला होता. कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे अगोदरच त्यांनी याबाबत चर्चा केली होती. तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल, असे भाकित देखील त्यावेळी चिनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. […]
‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ : 85 वर्षीय आजोबांनी ‘मी माझं जीवन जगलो आहे..’ असे म्हणत आपला बेड तरुणाला दिला आणि…
नागपूर : ‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ अगदी याच उक्तीप्रमाणे एका 85 वर्षीय आजोबांनी एका तरुण व्यक्तीसाठी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडला. नारायण भाऊराव दाभाडकर असं या आजोबांचं नाव आहे. परंतु ऑक्सिजन बेड सोडल्यानंतर पुढील तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणारे नारायण भाऊराव दाभाडकर रुग्णालयात भरती होते. त्यांची ऑक्सिजन पातळी 60 […]
मोठी बातमी : पुण्यात कडक लॉकडाऊन करण्याच्या मागणीला अजित पवार यांचा विरोध
पुणे : पुण्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाऊन करायचे याचा निर्णय आजच्या आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. माहिती मिळत आहे की प्रशासनाने पुण्यात १ ते १४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. मात्र, अजित पवार यांनी या मागणीला विरोध केला आहे. पुण्यात गेल्या काही […]
ब्रेकिंग : पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार, ग्राहकांवर परिणाम नाही
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.