mla kisan kathore car accident

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

महाराष्ट्र

अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून आमदार किसन कथोरे यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून बदलापूरच्या दिशेने चालले असता वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे असलेल्या तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. तर आमदार किसन कथोरे आणि त्याच्या गाडीचे चालक व सुरक्षारक्षक यांनादेखील किरकोळ दुखापत झाली असून त्यांना बदलापूरचा एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत