Woman gang raped at railway platform

धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

देश

नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.  पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, रेल्वे स्थानकात एकटी बसल्याचं पाहून तिघेजण तिच्याजवळ आले. त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध केला तेव्हा तिला रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या झुडपात खेचत नेलं आणि सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केल्यावर तिन्ही आरोपींनी पीडित महिलेला धमकावले की, जर पोलिसांत तक्रार दाखल केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आणि वैद्यकीय अहवाल आल्यावर पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत