पाटणा : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे विमानतळावर घडली. उतरत असताना पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत.
हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. हेलिकॉप्टर उतरल्यानंतर केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा लगेच बाहेर आले. या नंतर थोड्या वेळाने अपघात झाला.

Rotor blade of the helicopter carrying Union Minister @rsprasad was damaged at the airport hangar after the dignitaries had already alighted and left.
He is totally safe and sound.— RSPrasad Office (@OfficeOfRSP) October 17, 2020
हेलिकॉप्टरचा वेगाने फिरत असलेला पंखा हळू हळू स्थिर करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातात प्रवासी आणि हेलिकॉप्टर चालक यांच्यापैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. तंत्रज्ञांनी तातडीने रोटरचे ब्लेड बदलले आणि हेलिकॉप्टर सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेतली.




