Recruitment for 322 posts in Reserve Bank of India

कर्ज घेण्याचं प्रमाण झालं कमी, कर्जवितरण वाढवण्यासाठी RBI चे प्रयत्न सुरु

अर्थकारण देश

नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रिझर्व्ह बँक लवकरच अन्य बँकांशीही अशाच प्रकारच्या बैठका घेणार आहे. कारण या वर्षाच्या मार्च महिन्यात बँकिंग कर्जात अवघ्या पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा डेटा शुक्रवारीच आरबीआयने जाहीर केला आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात बँकिंग कर्ज वितरणामध्ये ४.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये ही टक्केवारी 6.8 इतकी होती. या महिन्यात अन्नधान्याचे क्रेडिट 24.4 टक्क्यांवरून 18.3 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत आणि सेवा क्षेत्रातील क्रेडिट 7.4 टक्क्यांवरून 1.4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

या महिन्यात वैयक्तिक कर्जाच्या वाढीचा दर 15 टक्क्यांवरून 14.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गृहकर्ज 15.4 टक्क्यांवरून घसरून 9.1 टक्क्यांवर आले आहे. तथापि, कृषी आणि संबंधित क्षेत्रांना दिलेली कर्जे 4.2 टक्क्यांवरून 12.3 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी मार्चनंतरच्या महिन्यांत कर्ज वितरणाची गती खूप वेगाने खाली आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत