Famous actor Bikramjit Kanwarpal dies due to corona

प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन

कोरोना मनोरंजन

नवी दिल्ली : बॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजित कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. 52 वर्षीय बिक्रमजित यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबासह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बिक्रमजित कंवरपाल यांचा जन्म हिमाचल प्रदेशात एका आर्मी ऑफिसरच्या घरात झाला होता. विक्रमजीत स्वतः देखील सैन्यात नोकरीस होते. 2002 मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बिक्रमजित यांनी ‘पेज 3’, ‘पाप’, ‘कॉरपोरेट’, ‘अतिथि तुम कब जाओगे’, ‘मर्डर 2’, ‘हे बेबी’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘आरक्षण’, ‘२-स्टेट्स’, ‘रॉकेट सिंह: सेल्समैन ऑफ द ईयर’ आणि ‘द गाजी अटैक’ यासह अनेक चित्रपटात काम केले. बिक्रमजीत यांनी बॉलिवूडमध्येच नव्हे तर छोट्या पडद्यावरही काम केले आहे.

प्रख्यात चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी ट्वीट करत बिक्रमजित कंवरपाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले कि, “ऐकून वाईट वाटले. मेजर बिक्रमजित कंवरपाल यांचे आज सकाळी कोरोनामुळे निधन झाले. सेवानिवृत्त लष्करी अधिकारी कंवरपाल यांनी अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. मी त्याच्या कुटुंबिय आणि जवळच्या लोकांच्या दुःखात सहभागी आहे. ॐ शांती!”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत