immediate lockdown needs in india for a few weeks over break the coronavirus chain says dr anthony s fauci
कोरोना देश

भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय, भारताला मदत करण्यात विश्व कमी पडलं – अमेरिकेचे साथरोग तज्ज्ञ डॉ. फौसी

नवी दिल्ली : भारतासारख्या देशात कोरोना साखळी तोडण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचं मत अमेरिकेतील साथरोग तज्ज्ञ डॉ. अँथनी एस फौसी यांनी व्यक्त केलं आहे. भारतात काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन लावलं तर परिस्थिती सुधारू शकते, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन सरकारमध्ये डॉ. अँथनी फौसी मुख्य आरोग्य सल्लागार म्हणून जबाबदारी हाताळत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशात तात्काळ काही दिवस ‘संपूर्ण लॉकडाऊन’ लागू केल्यास कोविडवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं, असं ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. फौसी म्हणाले. भारतात कोरोना संक्रमणाचा फैलाव जास्त असून अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि बेडसाठी झगडावं लागतं आहे. औषधांचा काळाबाजार सुरू आहे. लोक आणि प्रशासन हतबल होताना दिसत आहेत. नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या कोरोनामुळे भारत मोठ्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करत आहे. अशावेळी देशासमोर काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उपलब्ध राहतो.

डॉ. फौसी यांनी लसीकरण मोहिमेला जोर देण्याची गरजही व्यक्त केली. लसीकरण मोहिमेला वेग दिला तर कोरोनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकेल. कारण, सध्या भारतात लोक रस्त्यांवर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन धावताना दिसत आहेत. रुग्णालयांत दाखल होण्यासाठीही रुग्ण रांगेत उभे असल्याचं दिसून येतंय. मेडिकल ऑक्सिजनसाठी लढाई सुरू आहे. त्यामुळे त्वरीत ऑक्सिजन आणि औषधाच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची गरज आहे, असंही डॉ. फौसी म्हणाले.

डॉ. फौसी यांनी यापूर्वी ‘द गार्डियन’शी बोलताना भारतात निर्माण झालेली परिस्थिती वैश्विक असमानतेचं उदाहरण असल्याचं म्हटलं होतं. भारतातील कोरोना विषाणूचं थैमान रोखण्यासाठी पुरेशी मदत पोहचवण्यात विश्व कमी पडलं, असंही त्यांनी म्हटलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत