देशातील सर्व जनतेला करोना व्हायरसचा फैलाव रोखणारी लस मोफत मिळेल, असे केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या लशीकरणारवर सरकार ५०० रुपये खर्च करेल, असे प्रताप सारंगी म्हणाले. सर्व जनतेला करोनावरील लस मोफत दिली जाईल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी २० ऑक्टोबरला देशाला संबोधित करताना भारतीय शास्त्रज्ञ वेगवेगळया लशी बनवत असून, त्या चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत असे म्हणाले होते. प्रताप सारंगी हे पशुसंवर्धन, डेअरी, मासळी खात्याचे राज्यमंत्री आहेत.