कोरोना ने सम्पूर्ण जगाला अक्षरशः वेठीस धरले आहे. कोरोनामुळे सर्वात खराब परिस्थिती झालेल्या देशांपैकी स्पेन हा एक देश आहे. तसेच स्पेन मध्ये आता covid १९ च्या प्रकरणांमध्ये नवीन वाढ दिसून येत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या दुसर्या लाटेवर अंकुश ठेवण्यासाठी स्पॅनिश सरकारने रविवारी आपत्कालीन स्थिती जाहीर केली.
आपत्कालीन स्थितीमध्ये रात्रीचे कर्फ्यू देखील समाविष्ट असतील. यातून कॅनरी बेटे वगळण्यात आली आहेत. नवीन आणीबाणीची स्थिती पुढच्या वर्षी मेच्या सुरुवातीपर्यंत कायम राहील, असे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी दूरचित्रवाणी भाषणात सांगितले. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी ‘आम्ही ज्या परिस्थितीतून जात आहोत ती अत्यंत गंभीर आहे,’ असे सांगितले.
स्पॅनिश प्रदेशांकडून स्वत: ला कर्फ्यू लावण्याच्या अनुमतीसाठी सतत विचारणा केली जात होती. त्यानंतर झालेल्या अडीच तासांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रविवारी या उपायांवर सहमती दर्शविली गेली.