3 नोव्हेंबर रोजी डोमेस्टिक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड मायक्रोमॅक्स स्मार्टफोनची नवीन ‘In’ रेंज भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी नवीन मायक्रोमॅक्स सिरीज विषयी बरेच तपशील समोर आले आहेत. कंपनीची या सिरीजमध्ये दोन फोन बाजारात आणण्याची अपेक्षा असून मीडियाटेक हेलियो जी 35 आणि मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसरद्वारे हे चालविले जातील.
स्पेसिफिकेशन्स :
- हेलिओ जी 35 आणि मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसर
- 6.5 इंच एचडी + डिस्प्ले,
- 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज
- डिव्हाइसला 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते.
मायक्रोमॅक्सच्या ‘इन’ स्मार्टफोन सिरीजची किंमत 7,000 ते 15,000 रुपयांदरम्यान असू शकते. स्मार्टफोन विभागात पुन्हा प्रवेश सुरू करण्यासाठी मायक्रोमॅक्सची 500 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आहे.