व्हॉट्सअॅपने युजर्सच्या सोयीसाठी नवीन अपडेट जाहीर केले आहे. ह्या अपडेट फिचरला स्टोअर मॅनेजमेंट टूल (storage management tool) म्हणून ओळखले जाईल, जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. त्याचबरोबर, व्हॉट्स अॅपवरील हे नवीन स्टोअर मॅनेजमेंट टूल या आठवड्यात जगभरात आणले जाईल.
स्टोरेज मॅनेजमेंट टूल रोलआउट झाल्यानंतर युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं सोपं होईल. सरळ शब्दात सांगायचे म्हणजे, युजर्सना अधिक जागा व्यापणारे कन्टेन्ट ओळखण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त, हे मेसेज आणि मीडिया फाइल्स जास्त प्रमाणात सिलेक्ट करून delete करता येतील.
कंपनीकडून इझी क्लीनअप सूचनादेखील दिल्या जातील. म्हणजे बर्याच वेळा फॉरवर्ड केल्या गेलेल्या मोठ्या फायली आणि मीडिया सामग्रीबद्दल युजर्सना माहिती उपलब्ध करुन दिली जाईल. या व्यतिरिक्त फोनमध्ये कमी आकारापासून तर जास्त आकारापर्यंतच्या फायली एका आकारात प्लेस केल्या जातील, ज्यामुळे या फायली शोधणे सुलभ होईल.
व्हॉट्सअॅपच्या नवीन टूलच्या रोलआउटनंतर वापरकर्त्यांना सेटिंग्स ऑप्शनवर जावे लागेल, तिथे स्टोरेज आणि डेटा ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर आपण स्टोरेज मॅनेजमेंट ऑप्शनमध्ये जाऊ शकाल. व्हॉट्स अॅपच्या नवीन अपडेट्सनंतर युजर्स एक किंवा अनेक पर्याय निवडून कोणतीही फाईल डिलीट करतील, त्याआधी वापरकर्त्यांना प्री-व्ह्यू ऑप्शन पाहण्याचा पर्याय मिळेल.