UBON ने आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही लॉन्च केला आहे. नवीन 40 इंचाचा UBON स्मार्ट एलईडी टीव्ही फुल एचडी रेडी डिस्प्ले, 16: 9 स्क्रीन रेशियो आणि 24 वॅटच्या दमदार स्पीकरसह येतो. कंपनीने म्हटले आहे की हा स्मार्ट एलईडी टीव्ही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत बनविला गेला आहे.
UBON च्या 40 इंचाच्या स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये 1 जीबी रॅम आणि 8 जीबी स्टोरेज आहे. यात दोन HDMI पोर्ट आहेत. या टीव्हीमध्ये एक हेडफोन कनेक्टर आहे. हा टीव्ही अँड्रॉइड 9 टीव्ही ओएस सह आहे. कंपनीचा असा दावा आहे की स्मार्ट एलईडी टीव्हीचा स्क्रीन रीफ्रेश दर 50 हर्ट्झ आहे, जो टीव्ही पाहताना वास्तविक चित्रासारखी अनुभूती देईल. कंपनीने साउंड क्वालिटी क्रिस्टल क्लीअर असल्याचा दावाही केला आहे.
टीव्हीच्या लाँचिंगच्या प्रसंगी UBON चे व्यवस्थापकीय संचालक मंदीप अरोरा म्हणाले, ‘उत्सवाच्या हंगामापूर्वी UBON ने आपले सर्वाधिक प्रलंबीत उत्पादन म्हणजेच नवीन 40 इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही बाजारात आणला आहे. सध्याचा काळ लक्षात घेता ग्राहकांना परवडणार्या किंमतीत नवीन उत्पादनांची अपेक्षा असते. लोकांना डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमी काहीतरी नाविन्यपूर्ण हवे असते. या नवीन एलईडी टीव्हीमधील डिझाइन आणि ट्रेंडी वैशिष्ट्ये खिशालाही परवडणाऱ्या किंमतीवर उपलब्ध आहेत. ‘
नवीन स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत 18,999 रुपये आहे. हा टीव्ही देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.