gym
महाराष्ट्र

अखेर जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी मान्य

मुंबई : राज्य सरकारने अखेर जिम, व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी मान्य केली आहे. येत्या दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा सुरु होणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपायोजना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात जिम, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा सुरु करण्यास मान्यता देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज जिम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जिम, व्यायामशाळांना परवागनी मिळावी, यासाठी या संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत