Urmila Matondkar joins Shiv Sena

उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, शिवसेनेत जाहीर प्रवेश

महाराष्ट्र मुंबई

वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस सोडणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काही दिवसांपासून उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. संजय राऊत यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता. आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधलं.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. अभिनेत्री कंगना हिनं मुंबई, मुंबई पोलीस व बॉलिवूडबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर दिल्यामुळं अलीकडं उर्मिला पुन्हा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत