Royal Challengers Bangalore
क्रीडा

RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सने दिलेले १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट गमावून १९.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डीविलिअर्सने २२ चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या. सलामीवीरी देवदत्त पडिक्कलने ३५ आणि अॅरॉन फिंचने १४ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने ४३ धावा केल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डीविलिअर्सने नाबाद ५५ आणि गुरकीरत मानसिंहने नाबाद १९ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.तेवतियाने देवदत्त पडिक्कलला तर कार्तिक त्यागीने कर्णधार कोहलीला बाद केले. श्रेयस गोपालने अरॉन फिंचला बाद केले.

राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७८ धावांचे आव्हान ठेवले आहे. टॉस जिंकून फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने २० ओव्हरमध्ये ६ बाद १७७ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकार यांच्या जोरावर ५७ धावा केल्या. सलामीवीर रॉबिन उथप्पाने २२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार यांच्या जोरावर ४१ धावा केल्या. बेन स्टोक्स १५ धावा करुन बाद झाला. संजू सॅमसन नऊ धावा करुन परतला. जोस बटलर २४ धावा करुन बाद झाला. जोफ्रा आर्चर २ धावा करुन बाद झाला. राहुल तेवतिया १९ धावा करुन नाबाद राहिला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ख्रिस मोरिसने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याने ४ ओव्हरमध्ये २६ धावा देत सलामीवीर बेन स्टोक्स, अर्धशतकवीर स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर यांना बाद केले. युजवेंद्र चहलने सलामीवीर रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन या दोघांना बाद केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत