मुंबईः कोरोनाचा तडाखा क्रिकेट जगतासाठी आदरणीय असलेल्या मास्टरब्लास्टर सचिनला बसला. कोरोनामुळे सचिनने त्याचा अतिशय जवळचा मित्र गमावला. सचिन तेंडुलकरने स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. कोरोनामुळे मित्र गमावल्यामुळे सचिन प्रचंड दुःखी झाला. भावूक होत सचिनने ट्विटरवर मित्राविषयीच्या काही आठवणी शेअर केल्या.
सचिन ट्वीटमध्ये म्हणतो, ‘माझा प्रिय मित्र अवी कदम याचे निधन झाले. शाळेच्या दिवसांपासून अवी माझा जवळचा मित्र. क्रिकेटच्या सरावानंतर शिवाजी पार्क मैदानाबाहेर होणारी आमची भेट मला कायम लक्षात राहील. अवीच्या नातलगांकडे मी मनापासून शोक व्यक्त करतो.’
At a loss for words at the passing away of my dear friend, Avi Kadam.
A close friend of mine since school days, Avi was like family to me. Our memories of post practice catch-ups outside Shivaji Park will stay with me always.
My heartfelt condolences to his loved ones. ?? pic.twitter.com/ror2vSG9yy— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 19, 2020
अवी कदम याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना झाल्यामुळे अवीची तब्येत खालावली होती. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अवीची प्रकृती गंभीर असल्याचे कळल्यानंतर सचिनने फोन करुन अवीच्या घरच्यांकडे त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच डॉक्टरांशी बोलून अवीच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली होती. अवीचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष अयशस्वी झाला. त्याचे कोरोनामुळे निधन झाले. अवीच्या निधनाचे वृत्त कळताच सचिनला दुःख झाले. त्याने आपले दुःख ट्वीट करुन व्यक्त केले.
Extremely sad to hear about the demise of my old friend Avinash Kadam. He was like an elder brother to me. Will always remember our time together and his companionship.
May his soul rest in peace! ?? pic.twitter.com/QeLNFrXd3O— Vinod Kambli (@vinodkambli349) October 17, 2020




