Dhoni scripts thrilling last ball win for CSK
क्रीडा

इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून बाहेर पडल्यावर धोनीची मोठी घोषणा, धोनीच्या फेसबुक पोस्टने वेधले लक्ष

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२४ च्या हंगामात धोनीच्या फलंदाजीने सगळ्यांना आश्चर्यचकित केले, त्याच्या फलंदाजीने त्याने अनेक गगनचुंबी षटकार ठोकले. त्याच्या फिटनेसचे या हंगामात खूपच कौतुक झाले असले तरी धोनीचा हा शेवटचा हंगाम असल्याची चर्चा सुद्धा या हंगामात अनेकदा रंगली. अनेकांनी त्याच्या निवृत्तीबद्दल भाष्य केले पण अजून धोनीने यासंदर्भात कोणताच खुलासा केलेला नाही. याच पार्श्ववभूमीवर आता धोनीची एक फेसबुक पोस्ट फार गाजत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

धोनी फेसबुक पोस्ट करत म्हणाला आहे की, ” झेप घेण्याची वेळ आली, जे महत्वाच काम आहे ते करण्याची वेळ आली आहे, स्वतःची टीम सुरु करत आहे”. तर त्याच्या या पोस्टने लक्षवेधून घेतले असून चाहत्यांमध्ये या पोस्टवरून खूपच चर्चा होताना दिसते. संबंधित पोस्ट ही एक जाहिरातीचा भाग असल्याचे दिसत आहे. तर धोनील नेमकं या पोस्टमधून काय म्हण्याचे आहे याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

धोनी लवकरच उपचारासाठी लंडन गाठणार असल्याच्या चर्चा होत आहे कारण, गुडघ्याची त्याची दुखापत या हंगामात सुद्धा दिसून आली आणि त्यामुळे तो कमी कालावधीसाठी मैदानात उतरायचा. ”त्याच्या या दुखापतीचा त्याच्या खेळावर कुठेच परिणाम होताना दिसले नाही कारण हा हंगाम तो चाहत्यांसाठी खेळाला असल्याचे सीएसकेच्या प्रशिक्षकानांनी सांगितले”.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत