Tractor with laborers falls into 60-feet deep well, seven female farm laborers die
नांदेड महाराष्ट्र

ट्रॅक्टर मजुरांसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला, सात महिला शेतमजूरांचा मृत्यू

हिंगोली : शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. टॅक्टर साठ फूट खोल विहिरीत कोसळला असून विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. या घटनेत सात महिला शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर ट्रॅक्टरमध्ये बसून हळद काढण्यासाठी निघाल्या होत्या. दगडू शिंदे यांच्या शेतात काम करण्यासाठी हे मजूर आले होते. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यावेळी दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवण्यात यश आहे. पुरुभाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाचवण्यात यश आले आहे. ताराबाई जाधव, धरूपता जाधव, मीना राऊत, ज्योती सरोदे, चौथराबाई पारधे, सरस्पती भूरड, सिमरन कांबळे अशा एकूण सात महिलांचा मूत्यू झाला आहे. हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत