Pune Municipal Corporation seeks clarification from Dinanath Mangeshkar Hospital in Tanisha Bhise death case
पुणे महाराष्ट्र

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नी, तनिषा भिसे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने अनेक प्रश्‍न उभे राहिले आहेत. पैशांसाठी भिसे कुटुंबियांची रुग्णालय प्रशासनाने अडवणूक केली. मंत्रालयातून फोन जाऊनही कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तनिषा भिसे यांना जुळी मुले असल्यामुळे प्रसूती मुदतीपूर्वीच करावी लागली होती. प्रसूतीच्या वेदनेने ती विव्हळत असताना रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिच्या उपचारास दुय्यम वागणूक दिली. तनिषा यांची परिस्थिती क्रिटिकल होती, ब्लिडिंग होत होतं, पोटात दुखत होतं, बीपीही हाय होता, मात्र, याकडे कानाडोळा करत रुग्णालय प्रशासनाने त्यांना स्पष्टपणे सांगितले की, उपचारासाठी २० लाख रुपयांची रक्कम आवश्यक आहे, आणि त्यातले १० लाख रुपये आधी पैसे भरणे आवश्यक आहे. रुग्णालयाने या प्रकरणाला महत्त्व देण्यास नकार दिला आणि उपचारांसाठी पैसे न मिळाल्यामुळे तनिषा भिसे यांचा जीव गमवावा लागला.

तनिषा भिसे यांच्या प्रसुतीच्या वेळी त्यांच्या शरीरावर अत्यधिक ताण होता आणि त्या वेदनेने विव्हळत होत्या, पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना दिलासा देण्याऐवजी पैशांची मागणी केली. पैसे भरण्याशिवाय उपचार सुरू करणे अशक्य असल्याचा मुद्दा रुग्णालय प्रशासनाने मांडला. लग्नाच्या आठ वर्षांनी तनिषा या बाळाला जन्म देणार होत्या. त्यांना जुळी बाळ झाली. मात्र पैशांअभावी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने दोन मुलांना जन्म दिलेल्या आईला जीव गमावला लागला.

पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून या घटनेबाबत खुलासा मागितला आहे. पुणे महापालिका आरोग्य प्रमुख निना बोराडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, रुग्णालयाकडून संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाच्या तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. महापालिकेच्या याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असून, रुग्णालयाने आपला अहवाल सादर केला आहे.

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने या प्रकरणाबद्दल स्पष्टता देताना सांगितले की, संबंधित घटनेचा संपूर्ण अहवाल सरकारकडे पाठवला जाईल. रुग्णालयाच्या वतीने याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळाले नसून विविध लोक आणि राजकीय नेत्यांनी रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले आहेत.

सोशल मीडियावर टीका:
ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. भाजप नेत्या सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणावर आपले विचार व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभारावर कठोर टीका केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत