नागपूर : इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी राज्यात 65 नवी वसतिगृहे सुरू करण्याचे काम इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पूर्ण केले असून या उपक्रमाचे श्रेय मंत्री अतुल सावे यांना दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य मनिषा चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दहा–बारा वर्षे अडकलेला प्रश्न मार्गी […]
टॅग: Nanded
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द
मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत आहे. यापूर्वी मतदानाच्या दिवशीची जाहीर केलेली सुट्टी काही मतदारसंघात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे केवळ त्या मतदारसंघापुरती रद्द करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी 16 जिल्ह्यांतील नगरपरिषद/नगरपंचायतीमध्ये सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यात ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, अहिल्यानगर […]
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; सतर्कतेचा इशारा
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून आज दिनांक २६ जून रोजी २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू आहे. नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २६ […]
ट्रॅक्टर मजुरांसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला, सात महिला शेतमजूरांचा मृत्यू
हिंगोली : शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. टॅक्टर साठ फूट खोल विहिरीत कोसळला असून विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. या घटनेत सात महिला शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी […]
…अन्यथा ती दोन गावे वाहून गेली असती
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तेलंगणाच्या सिमेवर असलेले शेवटचे गाव अप्पारावपेठ. गत तीन दिवसाच्या सलग पावसाने किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगेसह सर्वच लहान-मोठ्या नदी, नाल्याचे पाणी धोक्याच्या पातळीवर आलेले. विशेष म्हणजे माहूरच्या डोंगररांगा या संपूर्ण किनवट तालुक्यासह आदिलाबाद पर्यंत पोहचलेल्या आहेत. याच डोंगररांगावर किनवट तालुक्यातील सिमेवरचे गाव म्हणून अप्पारावपेठ ओळखले जाते. या गावाची दुसरी ओळख म्हणजे या […]
येत्या 3-4 तासांत ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता
मुंबई : येत्या ३-४ तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा येथील घाट परिसर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने हलक्या ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे […]
नांदेडमध्ये खळबळ! २४ तासात दोन तरुणांची निर्घृण हत्या
नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. […]
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या, त्यांच्या घरासमोरच केला गोळीबार
नांदेड : नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेतायत. आज सकाळी ११ वाजेची […]
भीतीने घेतला चिमुकल्याचा बळी, माकड अंगावर येऊन बसले आणि…
नांदेड : नांदेडमध्ये मुदखेड तालुक्यातील बारड गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. माकडाबद्दल वाटणाऱ्या भीतीमुळे एका १० वर्षीय चिमुकल्याचा बळी गेला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वीर नागेश संगेवार हा १० वर्षांचा मुलगा घरासमोर खेळत होता. त्यावेळी अचानक एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. अंगावर माकड बसल्याने वीर खूप घाबरला. त्याने […]
प्रेमीयुगुलाने घरच्यांच्या विरोधाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
नांदेड : एका प्रेमीयुगुलाने घरच्यांकडून लग्नासाठी विरोध होत असल्याने आत्महत्या केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. दत्ता गणेश भिंगोरे (वय 24) आणि शारदा खंडू माने (वय 25 वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील दत्ता गणेश भिंगोरे आणि शारदा खंडू माने या दोघांमध्ये मागील अनेक […]










