Nanded! Two youths brutally murdered in 24 hours
क्राईम नांदेड महाराष्ट्र

नांदेडमध्ये खळबळ! २४ तासात दोन तरुणांची निर्घृण हत्या

नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. या दोन्ही खुनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यामध्ये पहिल्या घटने 23 वर्षीय अमोल साबणे याची हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री शहरातल्या देगलूर नाका भागात घडली. अमोल हा शुक्रवारी सकाळी शौचास पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात गेला होता त्यानंतर तो परत आलाच नाही. रात्र झाली तरी तो परत न आल्यानं त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमोलचा मृतदेह एका झुडपात आढळून आला आहे. अज्ञात आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करुन त्याचा खून केला. या प्रकरणी मृत अमोल याचा भाऊ श्याम साबणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेतील मृताचे नाव प्रेमानंद जोंधळे असं आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास मिल गेट रस्त्यावर 35 वर्षीय प्रेमानंद जोंधळे भररस्त्यात चाकूनं भोसकून खून करण्यात आला. प्रेमानंद जोंधळे हे शहरातील सोमेश कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांच्या घरासमोर कृष्णा हातागळे याचं घर आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या कुटुंबीयांचा वाद झाला होता. याच कारणातून कृष्णा हातागळे याने प्रेमानंद जोंधळे यांच्यावर चाकूनं सात ते आठ वार केले. यात प्रेमानंद यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. वजीराबाद पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत