Builder Shot Dead In Nanded Unidentified Assailants Fired Bullets Driver Injured
नांदेड महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या, त्यांच्या घरासमोरच केला गोळीबार

नांदेड : नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येत होते. पण उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार कुणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेतायत. आज सकाळी ११ वाजेची ही घटना घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या संजय बियाणी आणि यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या चालकाची प्रकृतीही चिंताजनक आहे. गोळीबाराच्या या घटनेने शहरात तणावाचे वातावरण आहे. संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे प्रस्थ होते. खंडणी वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, गोळीबाराची घटना cctv मध्ये टिपली गेली आहे का? याचा तपास पोलिस घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत