MLA Gopichand Padalkar was appreciated by Sadabhau Khot

गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त, सदाभाऊ खोत यांनी केलं कौतुक

महाराष्ट्र

सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे, असं म्हणत माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांचं कौतुक केलं आहे. गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हिंदकेसरी पै. मारुती माने यांच्या 83 व्या जयंतीनिमित्त पै.भीमराव माने युथ फाऊंडेशन व हिंदकेसरी व्हॉलीबॉल स्पोर्ट्स क्लब कवठेपिरान यांचे वतीने व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. यावेळी ते बोलत होते.

सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले की, “गोपीचंद बारका गडी आहे, पण अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. लेनन गाडी कितीही मोठी असू द्या पण एवढ्या एवढ्या जॅकवर ती गाडी उचलली जाते, असे गोपीचंद पडळकराचे काम आहे. आम्ही चुकून आमदार झालो, असे म्हणत खोत यांनी मला आमदारकी कशी मिळालीय हे सगळ्यांना माहीत असल्याचे सांगितले. ‘इडा पीडा टाळू आणि सदाभाऊंना आमदारकी मिळू दे’ असे मी आमदार झालोय, असे खोत म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जिरवा-जिरवीच्या राजकारणाला ऊत आलाय. तसंच जे विरोधात जातायत त्याच्या विरोधात कट कारस्थान करून मोठी मोठी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे पाप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहेत, अशी टीका खोत यांनी केली. शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे. एकदा माणूस राजकारणामध्ये वयाने ज्येष्ठ झाला की त्यांनी काहीही केले तर माफ असतं, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत