मुंबई : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कृष्णा चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्याकडून दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा “लेजंड दादासाहेब फाळके पुरस्कार, २०२२” मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथे 4 मे रोजी एका शानदार पुरस्कार समारोह कार्यक्रमात त्यांना दिला जाणार आहे.
डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी सोळाव्या लोकसभेत अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. लोकसभा मतदार संघात विकास कामे तर केलीच, परंतु देश पातळीवरील अनेक प्रश्न लोकसभेत मांडण्याचे काम केले. विदेशात ही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे काम केले. प्रामुख्याने भारत सरकारच्या “इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टॅंडिंग कमिटीच्या” सदस्यपदी असताना देशामध्ये ऑप्टिकल फायबर चे काम आणि एमटीएनएल बीएसएनएलच्या मोबाईल नेटवर्कसाठी विशेष प्रयत्न करून महत्त्वपूर्ण काम केले आणि लातूर लोकसभा मतदारसंघात रेल्वेनी पाणी आणले, रेल्वे बोगी कारखाना, अनेक नवीन रेल्वे सुरू केल्या. पासपोर्ट कार्यालय, पोस्टाचे विभागीय कार्यालय ,नीट एक्झाम सेंटर, आदी महत्त्वपूर्ण कामाबरोबर लातूर शहरांमध्ये “सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” रत्नागिरी ते नागपूर, राष्ट्रीय महामार्ग टेंभुर्णी ते लातूर राष्ट्रीय महामार्ग, अशा अनेक कामाचा पाठपुरावा करून त्यांनी जनतेची सेवा केली आहे.
या सर्व कामाची दखल घेऊन कृष्णा चव्हाण फाउंडेशन (केसीएफ) मुंबई या संस्थेकडून लेजंड दादासाहेब फाळके अवॉर्ड मान्यवराच्या हस्ते दिला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. सुनील गायकवाड यांना हा पुरस्कार तर दिलाच आहे, परंतु या कार्यक्रमासाठी त्यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. डॉक्टर गायकवाड यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत बॉलीवुड क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल याठिकाणी दिला जाणार आहे. त्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराकडून डॉक्टर गायकवाड यांचे अभिनंदन केले जात आहे.




