Unique Valentine's Day Gift, Husband Gifts Kidney to Sick Wife

‘व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट, नवरा आपल्या आजारी बायकोला भेट देणार किडनी

तब्येत पाणी देश

गुजरातमध्ये एक व्यक्ती व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या आजारी पत्नीला आपली किडनी दान करून एक अनोखी भेट देत आहे. विनोद पटेल 14 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पत्नी रीता पटेल यांना किडनी दान करतील. खास गोष्ट अशी की, हे जोडपे आपला लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करीत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रीता पटेल या ऑटोइम्यून मूत्रपिंड डिसफंक्शनने ग्रस्त आहेत आणि गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार करूनही रीताच्या मूत्रपिंडाचा आजार बरा झाला नाही. यानंतर तिच्या पतीने तिला किडनी दान करण्याची तयारी दाखवली. तपासादरम्यान, पती विनोदची किडनी रीतासाठी योग्य असल्याचे आढळले. यानंतर, विनोदने 14 फेब्रुवारीला प्रेमाची भेट  म्हणून किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. ते अहमदाबादच्या एका खासगी रुग्णालयात किडनी दान करतील.

अहमदाबादचे डॉक्टर सिद्धार्थ मवानी म्हणाले की ऑटोइम्यूनचा आजार झाल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या निरोगी अवयवांवर आक्रमण करण्यास सुरवात करते. यामुळे रीताची किडनी खराब झाली आहे. तसेच विनोदने सांगितले की पत्नीला होणाऱ्या वेदना बघणं सहन न झाल्याने त्यांनी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की रीता 44 वर्षांची आहे आणि गेल्याच महिन्यात त्यांचे डायलिसिसही झाले होते.

विनोद पटेल यावेळी म्हणाले कि, “मला सर्वांना सांगावं वाटत की सर्वांनी त्यांच्या जोडीदाराचा आदर केला पाहिजे आणि गरज पडल्यास एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे यायला हवे.” रीता स्वत: ला भाग्यवान मानतात की त्यांच्या पतीने किडनी दान केल्यामुळे त्या पुन्हा एकदा आपलं आयुष्य जगू शकतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत