गुजरात : गुजरातच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्त्वाखालील सध्याच्या मंत्रिमंडळाने अचानक सर्व सदस्यांचे राजीनामे सादर केले. हे राजीनामे केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर घेण्यात आले असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकदरम्यान वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांना हा निर्णय समजावून सांगितला. यानंतर सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे सुपूर्द केले. सुरुवातीला […]
टॅग: Gujarat
नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्यांचा धक्कादायक प्रकार: अविवाहित तरुणाला दारू पाजून शस्त्रक्रिया
गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर […]
IPL RR v RCB 2022 : राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर फायनलमध्ये, जोस बटलरचे धमाकेदार शतक, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम
अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तसेच एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. तर […]
मुंबईनंतर गुजरातमध्ये आढळला कोरोनाच्या XE व्हेरिएंटचा रुग्ण
नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, XE चे एक प्रकरण गुजरातमध्ये आढळून आले आहे. 11 मार्च रोजी रुग्णाची कोविड-19 साठी सकारात्मक चाचणी झाली आणि एका आठवड्यात तो बरा झाला होता. जीनोम-सिक्वेंसिंगनंतर, रुग्णाला कोरोनाव्हायरसच्या XE प्रकाराने संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तथापि, हे XE प्रकार असल्याची पुष्टी करण्यासाठी नमुन्याची पुन्हा तपासणी […]
Video : पॅरासेलिंग करताना तुटली पॅराशूटची दोरी, ‘त्या’ दाम्पत्याचं पुढे काय झालं? जाणून घ्या…
दीव : दीवमध्ये पॅरासेलिंग करताना एका दाम्पत्याच्या पॅराशूटची दोरी तुटल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अजित काथड आणि त्यांची पत्नी सरला गुजरातच्या उना किनारपट्टीवर पॅरासेलिंग करण्यासाठी गेले असताना रविवारी ही घटना घडली होती. राईड करत असताना काही मिनिटांतच त्यांच्या पॅराशूटची पॉवरबोटला बांधलेली दोरी तुटली. त्यानंतर हे जोडपे थेट समुद्रात पडले. मात्र, सुदैवाने अजित किंवा त्यांची […]
गुजरातमध्ये लव्ह जिहाद कायदा होणार लागू, जाणून घ्या या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद
गुजरात : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहाद कायद्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर करणार्यांवर आणि फसवणूक करुन विवाह करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विधेयक गुजरात विधानसभेत जोरदार गदारोळात पारित झाले. गुजरातचे राज्यपाल आचार्य […]
कोरोनाचं भयावह रूप.. 24 तास अंत्यसंस्कार सुरु असल्याने वितळली विद्युतदाहिन्यांची धुराडी आणि मेटल फ्रेम
सुरत : कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून सर्वत्र हाहाकार माजला आहे. गुजरातमध्येही भयंकर परिस्थिती ओढवलेली दिसत आहे. सुरतमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढला आहे. यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्यांवर प्रचंड ताण पडत असून उष्णतेमुळे विद्युतदाहिन्यांची धुराडी तसेच गॅस फर्नेसच्या मेटल फ्रेम देखील वितळल्या आहेत. मृतांची संख्या प्रचंड असल्याने सुरतच्या स्मशानभूमींमध्ये 24 तास […]
महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार
जागतिक महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थान येथील अजमेरमध्ये गुजरातच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी तरुणीला JLN रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक […]
ब्रेकिंग : मोटेरा स्टेडियमचे नाव झाले ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’, जाणून घ्या या स्टेडियमची खास वैशिष्ट्ये
अहमदाबाद : मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज अहमदाबादच्या या स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले. उयावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित […]
‘व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट, नवरा आपल्या आजारी बायकोला भेट देणार किडनी
गुजरातमध्ये एक व्यक्ती व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या आजारी पत्नीला आपली किडनी दान करून एक अनोखी भेट देत आहे. विनोद पटेल 14 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पत्नी रीता पटेल यांना किडनी दान करतील. खास गोष्ट अशी की, हे जोडपे आपला लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रीता पटेल या ऑटोइम्यून मूत्रपिंड डिसफंक्शनने ग्रस्त आहेत आणि गेल्या […]










