Gujarat Couple Falls Into Sea After Parachute Rope Snaps Mid-air During Parasailing in Diu
देश

Video : पॅरासेलिंग करताना तुटली पॅराशूटची दोरी, ‘त्या’ दाम्पत्याचं पुढे काय झालं? जाणून घ्या…

दीव : दीवमध्ये पॅरासेलिंग करताना एका दाम्पत्याच्या पॅराशूटची दोरी तुटल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अजित काथड आणि त्यांची पत्नी सरला गुजरातच्या उना किनारपट्टीवर पॅरासेलिंग करण्यासाठी गेले असताना रविवारी ही घटना घडली होती. राईड करत असताना काही मिनिटांतच त्यांच्या पॅराशूटची पॉवरबोटला बांधलेली दोरी तुटली. त्यानंतर हे जोडपे थेट समुद्रात पडले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मात्र, सुदैवाने अजित किंवा त्यांची पत्नी सरला या दोघांनाही दुखापत झाली नाही आणि ते जखमी न होता बचावले. त्यांनी लाइफजॅकेट घातलेले होते आणि समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी (lifeguards) त्यांना लगेचच वाचवले. अजित काथड यांचा मोठा भाऊ राकेश धारेचा हे तेथे त्यांचा पॅरासेलिंगचा व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपण्यासाठी उपस्थित होते. राकेश यांनी सांगितले कि, “मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो आणि जेव्हा दोरी तुटली तेव्हा काय करावे हे मला कळत नव्हते. मी माझा भाऊ आणि वहिनींना खूप उंचीवरून पडताना पाहत होतो आणि त्या क्षणी मला इतके असहाय्य कधीच वाटले, जितके याअगोदर कधीही वाटले नाही.”

या घटनेचा व्हिडिओ राहुल धारेचा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्यास सांगितले आहे.

या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे या जोडप्याला मोठा धक्का बसला. अजित यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले कि, “आम्ही आमच्या लाइफ जॅकेटमुळे तरंगत राहिलो, तेव्हा माझी पत्नी एकदम शॉक्ड होती आणि ती काही मिनिटे बोलू शकली नाही. आमचा पॅराशूट ज्या पॉवरबोटवर बांधला होता त्यांना आम्ही मदतीची विनंती केली, पण त्यांनी आम्हाला सांगितले की जीवरक्षक आम्हाला वाचवतील. सुमारे पाच मिनिटानंतर, जीवरक्षक दुसर्‍या पॉवरबोटीवर आले आणि त्यांनी आमची सुटका केली.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत