Gujarat Chief Minister Vijay Rupani infected with corona
देश

गुजरातमध्ये लव्ह जिहाद कायदा होणार लागू, जाणून घ्या या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद

गुजरात : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहाद कायद्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर करणार्‍यांवर आणि फसवणूक करुन विवाह करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विधेयक गुजरात विधानसभेत जोरदार गदारोळात पारित झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नुकतीच लव्ह जिहाद कायद्याला मान्यता दिली होती. त्यानंतर राज्यात लव्ह जिहादसंदर्भात प्रभावी कायदा करण्यात आला. राज्यात हा कायदा अंमलात आणण्यामागील हेतू असा आहे की कोणीही बळजबरीने किंवा कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराने कुणाचा धर्म बदलू शकणार नाही.

लव्ह जिहाद कायद्यानुसार,

  1. फसवणूक करून लग्न करून धर्मांतर करण्यास भाग पाडल्यास 10 वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.
  2. धर्म लपवून लग्न करणार्‍यांना पाच वर्ष कैद आणि दोन लाख रुपये दंड
  3. धर्म लपवून अल्पवयीन मुलीशी लग्न केल्यास सात वर्षांची शिक्षा किंवा तीन लाख रुपये दंड अशी तरतूद आहे.
  4. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना तीन लाख रुपये दंड आणि सात वर्षांच्या तुरूंगवासाची तरतूद आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत