24-year-old model dies after iron pillar collapses before fashion show
देश

फॅशन शो सुरू होण्यापूर्वी लोखंडी खांब कोसळून २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

नोएडा : फॅशन शो सुरू होण्यापूर्वी लोखंडी खांब कोसळून झालेल्या दुर्घटनेत २४ वर्षीय मॉडेल वंशिकाचा मृत्यू झाला. नोएडातील फिल्म सिटीत फॅशन शो सुरू होण्यापूर्वी ही दुर्घटना घडली. मॉडेल वंशिका चोपडाच्या मृत्यूप्रकरणी सेक्टर २० पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत मॉडेलचा भाऊ हर्ष चोपडानं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर फॅशन शो आयोजक आणि इतर ४ जणांना अटक करण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी स्टुडिओ मॅनेजर, लायटिंग ट्रस म्हणजेच तो खांब लावणाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्ली एनसीआरसह अन्य ठिकाणांहून जवळपास ३० मॉडेल्ससह इतर अनेकजण पोहोचले होते. वंशिका तयारीचा आढावा घेत असताना लायटिंग ट्रस कोसळला. त्याखाली दबली गेल्यानं वंशिका जखमी झाली होती, त्यातच तिचा मृत्यू झाला. लायटिंग ट्रस कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कोसळला असता, तर अनेक जण त्याखाली दबले असते. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकली असती. दुर्घटनेवेळी लायटिंग ट्रसच्या खाली मोजकीच माणसं उपस्थित होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

वंशिकाचा भाऊ हर्ष चोपडाने कार्यक्रमाच्या व्यवस्थापकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले कि, ‘माझ्या बहिणीला फॅशन शोमध्ये प्रमोटरची भूमिका पार पाडण्यासाठी बोलावलं होतं. आयोजकांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला आणि त्यात माझ्या बहिणीचा जीव गेला.’ दुर्घटनेची माहिती मिळताच हर्ष रुग्णालयात गेला. मात्र डॉक्टरांनी वंशिकाला मृत घोषित केलं होतं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत