कोलकाता : ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय (NSCBI) विमानतळाने बुधवारी सकाळी ८.30 ते सायंकाळी ७.45 दरम्यानची सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत.
कोलकाता एअरपोर्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीटद्वारे माहिती देण्यात आली आहे कि, ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेली चेतावणी लक्षात घेता, कोलकाता एअरपोर्ट येथील विमान उड्डाणे बुधवारी सकाळी ८.30 ते सायंकाळी ७.45 पर्यंत रद्द केली आहेत. आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत.
In view of the weather warning by @Indiametdept over #CycloneYaas, flight operations at #KolkataAirport will be suspended from 0830 IST upto 1945 IST on 26.05.2021.We sincerely apologise for the inconvenience caused.@AAI_Official@MoCA_GoI@HardeepSPuri@HomeBengal #Yaas
— Kolkata Airport (@aaikolairport) May 25, 2021




