Mig Crash In Rajasthan Barmer Of Indian Airforce
देश

भीषण दुर्घटना, हवाई दलाचं मिग-२१ विमान क्रॅश, दोन पायलट शहीद

जयपूर : राजस्थानमधील बाडमेर मध्ये एक मिग एअर क्राफ्ट क्रॅश झालं आहे. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर परिसरात पडले असल्याची माहिती समोर आले आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ अपघातग्रस्त झालं असून यामध्ये दोन पायलट होते, अशी माहिती आहे. ही दुर्घटना बाडमेरच्या बायतू क्षेत्रातील भीमडा गावात घडली आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ भीमडा गावाजवळून उड्डाण घेत होतं. अद्याप विमान का दुर्घटनाग्रस्त झालं याची माहिती समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वायूसनेचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतीय हवाई दलाचं मिग फायटर २१ हे विमान राजस्थानातील भीमडा गावात कोसळलं. या घटनेत भारतीय हवाई दलाचे दोन पायलट जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ते दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती आहे. विमानाचे पायलट नेमके कोण होते, याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा थरार व्हिडिओ देखील समोर आला आहे. बैतू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमडा येथे जोरदार स्फोट होऊन विमान पडले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. विमान कोसळल्यानंतर मोठे आगीचे लोळ उठले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यात अपघातानंतर विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे दिसत आहे. जमिनीवर पायलटचा मृतदेहही दिसत आहे.  मिग-२१ कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे हवाई दलप्रमुख व्ही.आर. चौधरी यांच्याशी चर्चा केली आहे. हवाईदल प्रमुखांनी या घटनेबद्दल राजनाथ सिंह यांना माहिती दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत