आसाम : टेकऑफ आधीच इंडिगोचं विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी टेकऑफ करण्याआधीच विमान धावपट्टीवरून घसरलं, त्यानंतर चिखलात अडकलं. यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. विमाल धावपट्टीवरून घसरून शेजारी असलेल्या चिखलात अडकलं, यामुळे सुरुवातीला उड्डाणाला उशीर झाला, पण नंतर विमानाची चाकं चिखलातून बाहेर न आल्याने विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी आसाममधील जोरहाट येथून कोलकालासाठी 6E757 हे विमान उड्डाण घेणार होते. पण विमान टेकऑफआधीच धावपट्टीवर घसरून बाजूला असलेल्या चिखलात गेलं. विमानाची चाकं चिखलात रुतून बसली होती. पायलट विमान पुन्हा धावपट्टीवर नेण्यासाठी प्रयत्न करत होते. पण विमान चिखलात रुतल्यामुळे सुमारे दोन तास विमान थांबवल्यानंतर अखेर हे उड्डाण रद्द करण्यात आलं.




