इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्याचे काम सुरु

कोरोना क्रीडा देश

कोलकाता शहरातली वाढती करोनाबाधित रुग्णसंख्या पाहता, ऐतिहासीक इडन गार्डन्स मैदानाचा वापर आता कोविड सेंटर म्हणून करण्यात येणार आहे. इडन गार्डन्स मैदानातील गॅलरी भागात कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनला याबद्दल परवानगी मागितली होती. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या परवानगी नंतर कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून लवकरच हे सेंटर कार्यरत होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रुग्णांसाठी बेड, पंखे यांची सोय करण्यात आलेली आहे. आम्ही मैदानाच्या E आणि F गॅलरी समोरील भागात सुविधा केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे कोविड सेंटर रुग्णांसाठी वापरता येईल. याव्यतिरीक्त F Block समोर आमचं एक छोटंसं हॉस्पिटल आहे त्याचाही वापर करता येईल”, अशी माहिती बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत