crime
पुणे महाराष्ट्र

पुण्यात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आशिष मारुती धनके (वय २२, रा. फुरसुंगी, पुणे व मूळगांव- धनके वस्ती, सारोळा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, विनयभंग करणे, बाललैंगिक अत्याचार, दरोड्याची तयारी करणे, दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या या अट्टल गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. मागील 5 वर्षांमध्ये त्याच्याविरूध्द 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.

प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी नमूद व्यक्तीविरुध्द एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. नमूद व्यक्तीस स्थानबध्द करण्यामध्ये अरविंद गोकुळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पो. स्टे. पुणे शहर व वैशाली चांदगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी.गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली. पोलीस आयुक्तांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही 18 वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत