Assistant Inspector of Police Bhushan Pawar shot himself and committed suicide
महाराष्ट्र मुंबई

सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांची आत्महत्या, पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडली

नवी मुंबई : APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सरकारी रिव्हॉल्व्हरने पोलीस ठाण्यातच पवार यांनी स्वत:वर गोळी झाडली. भूषण पवार यांना तातडीने MGM रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत APMC पोलीस ठाण्यात भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. दुपारी 12च्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे. भूषण पवार हे 42 वर्षांचे होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत