मुंबई : ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग सिडको महामंडळामार्फत करण्यास आणि त्यासाठीच्या ६ हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंमलबजावणी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग या प्रकल्पाच्या अंदाजित ६ हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली. […]
टॅग: navi mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नवीन सदस्यांची नियुक्ती
मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) राजीव निवतकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, निवतकर आणि वारभुवन यांना आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी सदस्य पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली . आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील मुख्यालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. याप्रसंगी आयोगाचे सदस्य अभय वाघ […]
भाजप नेते गणेश नाईकांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई, दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला
मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश […]
नवी मुंबईत देशातील सर्वात मोठे इव्ही चार्जिंग स्टेशन
मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री देसाई म्हणाले की, दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर […]
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. साताऱ्यातील पुसेगाव येथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या […]
सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांची आत्महत्या, पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडली
नवी मुंबई : APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सरकारी रिव्हॉल्व्हरने पोलीस ठाण्यातच पवार यांनी स्वत:वर गोळी झाडली. भूषण पवार यांना तातडीने MGM रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत APMC पोलीस ठाण्यात भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी […]
नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा झाल्या सुरु
कोरोनाचा कहर काहीसा कमी व्हायला लागला आहे. त्यामुळे आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असून, दैनंदिन काम देखील सुरु आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रभर शाळाही हळू हळू सुरू व्हायला लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळा सुरु असून आता शहरी भागातील पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा उघडू लागल्या आहेत. नवी मुंबईतील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांमध्ये […]
तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळू देशमुख असं मृत जवानाचे नाव आहे. औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे-39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला काल (5 डिसेंबर) रात्री 12 च्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी […]








