Former Mumbai Police Commissioner Dhananjay Jadhav passes away
महाराष्ट्र मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं निधन

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचं आज पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. साताऱ्यातील पुसेगाव येथे आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या धनंजय जाधव यांनी पोलीस दलात अनेक पदं भूषवली. साताऱ्यातील पुसेगाव इथं १९४७ साली त्यांचा जन्म झाला. तिथंच त्यांच प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी एमएससीची पदव्युत्तर पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले.
शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असतानाच ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन 1973 मध्ये भारतीय पोलिस सेवेत प्रवेश केला. आधी धुळे, नंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले. तर 2007 मध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. याच पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरची पहिली दोन वर्षे त्यांनी एमपीएससी बोर्डावर काम केलं. त्यानंतर त्यांच्या मुळ गावी एक शिक्षण संस्था सुरू केली.

जाधव यांना उत्कृष्ट सेवेबद्दल 1992 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी पोलीस पदक प्रदान करुन जाधवांचा गौरव केला होता. त्याच वर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत