नागपूर : सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एएसआय नरेंद्र बघेल या पोलीस अधिकार्याच्या मुलाचा मृतदेह मॉलमध्ये आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे.
फॉर्च्युन मॉल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे या प्रकरणात गूढ निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाने २०१६ मध्ये फॉर्च्यून मॉलला असुरक्षित घोषित केले होते. दरम्यान, ही हत्या असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या प्रकाराची माहिती मिळताच शहरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तपास सुरु आहे.




