Corona's new guidelines issued by the state government
कोरोना महाराष्ट्र

राज्य सरकारने जारी केल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काल राज्यात सर्वाधिक २५ हजार नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळं सरकारकडून हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आज सरकारने नव्यानं गाईडलाईन्स जारी करत खासगी कार्यालयांवर निर्बंध घातले आहेत.(आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र यातून वगळण्यात आले आहेत.)

गाइडलाईन्स :

  1. राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवण्याचे निर्देश
  2. नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी
  3. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
  4. धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, कोरोना रुग्णसंख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत