Veteran leader Vinayakdada Patil passes away

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे निधन, रोलेक्स अवॉर्ड मिळवणारे एकमेव भारतीय

नाशिक महाराष्ट्र

नाशिक : ज्येष्ठ माजी मंत्री, लेखक, साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मुंबईत काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर करोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. ज्या वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जेट्रोफांची लागवड आता सरकारमार्फत सर्वत्र करण्यात येत आहे. तसेच जगातील अनेक देशांत ही लागवड केली जात आहे.

विनायकदादा पाटील यांना मिळालेले पुरस्कार :

  1. वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार
  2. वनश्री पुरस्कार
  3. भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी purskar
  4. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया
  5. जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्ड (हा पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय)
  6. प्रतिष्ठेचा जमनालाल बजाज पुरस्कार
  7. त्यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय- ललित गद्य विभागासाठीचा राज्य शासनाचा अनंत काणेकर पुरस्कारही देण्यात आला होता.

यशोधन, निलगिरीची शेती, एक्केचाळीस वृक्ष, ऑइल ग्लूम टू ऑइल ब्लूम, जेट्रोफा २००३ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत.

विनायकदादा पाटील यांनी कुंदेवाडीचे सरपंच म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर निफाड पंचायत समिती सभापती, आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. कुंदेवाडी विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांना महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही पाच वर्षे देण्यात आले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत