BJP leader Ganesh Naik could be arrested at any time pre-arrest bail denied in both cases

भाजप नेते गणेश नाईकांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई, दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. नेरुळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यातील दोन्ही गुन्ह्यात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा जामीन नाकारल्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भाजप नेते गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर त्यांच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. बेलापूर आणि नेरुळ इथे दाखल झालेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी याचिका गणेश नाईक यांनी दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली होती. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं निकाल आजसाठी राखून ठेवला होता. दरम्यान आज न्यायालयानं दोन्ही प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

नेमकं प्रकरण काय?
गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेनं तब्बल 27 वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचे या महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. त्यानंतर नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत