मुंबई : ईडीने मोठी कारवाई करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यानंतर ईडीकडून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. राऊत यांची अलिबागमधील जमीन आणि मुंबईतील एक प्लॉट जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
ED attached Sanjay Raut’s property.
— ADV. ASHUTOSH J. DUBEY ?? (@AdvAshutoshBJP) April 5, 2022




