रायगड/पुणे : पुण्याहून कोकणात फिरायला निघालेल्या तरुणांचा थार एसयूव्हीसह (MH12 YN 8004) ५०० फूट खोल दरीत पडून भीषण अपघात झाला असून, सहा तरुणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रकार रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात उघडकीस आला. उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवार, १७ नोव्हेंबर, मध्यरात्रीनंतर घडला असावा. मात्र, तरुणांच्या पालकांनी […]
टॅग: rescue operation
अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका
अहिल्यानगर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली. कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील […]
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी […]
कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
पुणे : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (दि. १५ जून) जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी […]
ट्रॅक्टर मजुरांसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला, सात महिला शेतमजूरांचा मृत्यू
हिंगोली : शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. टॅक्टर साठ फूट खोल विहिरीत कोसळला असून विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. या घटनेत सात महिला शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी […]
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह
पुणे : पुणे शहराच्या सांगवी भागात राहणारी 21 वर्षीय मानसी प्रशांत गोविंदपूरकर हिचा मृतदेह बुधवारी सकाळी लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळ आढळला. मानसी 18 मार्च 2025 पासून बेपत्ता होती, आणि तिचा शोध घेतला जात होता. मानसी लोहगड किल्ल्यावर एकटीच गेली होती, तिने तिथे पोहोचण्यासाठी खाजगी टॅक्सी बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी ८:५६ वाजता […]
देवघर रोपवे दुर्घटना : बचाव कार्यादरम्यान पुन्हा मोठी दुर्घटना, 1500 फूट उंचीवरून पडून महिलेचा मृत्यू
झारखंड : देवघर रोपवे दुर्घटनेच्या बचाव कार्यादरम्यान पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. यावेळी एक महिला अपघाताची बळी ठरली आहे. तिला देवघर सदर रुग्णालयात पाठवले, मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. ट्रॉलीच्या केबिनमधून बाहेर काढल्यानंतर तिला उचलत असताना महिला खाली पडली आणि जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून […]
लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, सीडीएस बिपीन रावत रुग्णालयात दाखल
तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]








