Center issues new guidelines on corona

कोरोनासंदर्भात BMC ने नव्याने जारी केल्या गाईडलाईन्स, जाणून घ्या…

कोरोना मुंबई

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणारी इमारत सील केली जाणार असून गृह विलगीकरण केल्या जाणाऱ्या राहिवाशांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे या ठिकाणी धाडी टाकण्याचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनासंदर्भात नव्याने जारी करण्यात आलेल्या गाईडलाईन्स :

 1. लक्षण विरहित रुग्णांना घरी विलगीकरण (होम क्वारंटाइन) करण्यात येते. अशा रुग्णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारण्यात यावेत. तसेच त्यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्सच्या माध्यमातून त्यांच्यारवर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्यक्तिंना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून ते घरी असल्याची खातरजमा करावी. बाधित व्यक्तिंची योग्य माहिती ठेवून त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तिंचे विलगीकरण करावे. या रुग्णांचा विलगीकरण कालावधी पूर्ण होण्या‍आधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्णांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करावे.
 2. ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील, अशा निवासी इमारती प्रतिबंधित (सील) करण्यात याव्यात.
 3. मंगल कार्यालये, जिमखाना/क्लब्ज, नाइट क्लब, उपहारगृह, चित्रपटगृह, सर्वधर्मिय स्थळ, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्कचा वापर होत नसल्याचे आढळल्यास आणि ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकावेळी आढळल्यास संबंधित व्यक्तिंना दंड करण्यासोबत त्या-त्या ठिकाणच्या आस्थापनांवर, व्यवस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
 4. लग्न सोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करावी. दररोज अशाप्रकारच्या किमान ५ जागांवर धाड टाकून तपासणी करावी. तिथे कोणत्यांही नियमांचे उल्लंघन झालेले असेल तर दंडात्मक कारवाई करून लग्नातचे आयोजक/पालक तसेच संबंधित व्यवस्थापनांवर देखील गुन्हे दाखल करावेत.
 5. मास्कचा योग्यरित्या उपयोग न करणाऱ्या तसेच सार्वजनिक जागी थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मुंबईत सध्या कार्यरत असलेल्या २ हजार ४०० मार्शल्सची संख्या दुपटीने वाढवून ती ४ हजार ८०० इतकी करावी. विना मास्क फिरणाऱ्यांवर जरब बसवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्या होत असलेली सरासरी १२ हजार ५०० नागरिकांवरील कारवाईची संख्या वाढवून दररोज संपूर्ण मुंबईत मिळून किमान २५ हजार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
 6. मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर उपनगरीय रेल्वे सेवांच्या गाड्यांमध्ये विना मास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक मार्गावर १०० याप्रमाणे एकूण ३०० मार्शल्स नेमून विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी.
 7. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्या‍त येत असून पोलीस देखील मार्शल म्हणून नागरिकांकडून दंड आकारून कारवाई करु शकतील.
 8. मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या सर्व इमारती, कार्यालये, रुग्णालये आदी ठिकाणी आवश्यकतेनुसार महानगरपालिकेच्यात शिक्षकांची नियुक्ती करून त्यांना विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येतील.
 9. सर्वधर्मिय प्रार्थनास्थाळांच्या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून तेथे नियमांचे पालन होत असल्याबाबत लक्ष ठेवण्यात येईल. विना मास्क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्लंघन केल्यास तेथेही कारवाई करण्यात येईल.
 10. खेळाच्या मैदानांवर व उद्यानांमध्ये देखील विना मास्क आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
 11. कोविड बाधित रुग्णांची संख्या अधिक असलेल्या विभागांमध्‍ये मिशन झिरोच्या धर्तीवर कार्यवाही सुरू करावी. ज्या विभागांमध्ये नवीन रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत, तेथे एरिया मॅपिंग करून, त्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त संख्ये‍ने चाचण्या करण्यात याव्यात. तसेच अशा परिसरांमध्ये प्रति रुग्णामागे किमान १५ नजीकच्या संपर्कातील व्यक्ती (हायरिस्क कॉन्टॅक्ट) शोधून त्यांना विलगीकरणात ठेवावे.
 12. झोपडपट्टी, अरुंद वस्ती, दाट वस्तींमध्ये बिगरशासकीय संस्थांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून संशयितांची तपासणी करावी. फिरत्या दवाखान्यांच्या (मोबाइल व्हॅन) माध्यमातून रुग्ण शोध मोहीम सुरु ठेवावी. चाचण्या कराव्यात.
 13. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्याक्तिंसाठी करोना केअर सेंटर १ आणि लक्षणे नसलेल्या बाधितांसाठी करोना केअर सेंटर २ असे दोन्‍ही संवर्गातील प्रत्येकी किमान एक केंद्र कार्यान्वित ठेवावे.
 14. जम्बो कोविड सेंटरमधील क्षमतांचा आढावा घेऊन नियमित रुग्णशय्या, ऑक्सिजन रुग्णशय्या यांची पुरेशी उपलब्धता ठेवावी.
 15. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांतून कोविड रुग्ण, रुग्णशय्या व इतर आवश्यक माहिती दर तासाने संकलित करून ती माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने अद्ययावत करावी.
 16. केंद्र सरकारच्या नियमावलीप्रमाणे आता ब्राझिलमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाही संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत