Case filed against a TV actor who runs a sex racket of minors internationally
महाराष्ट्र

लैंगिक अत्याचार झालेल्या तीन वर्षांच्या मुलीने दिली साक्ष, आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

जळगाव : जळगाव न्यायालयाने लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणात तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. केवळ तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्म ठेपेची शिक्षा जाहीर केल्याच्या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथील तीन वर्षीय बालिकेवर घराशेजारीच राहणाऱ्या किशोर भोई या 38 वर्षीय तरुणाने चॉकलेटचे आमिष देऊन 26 मार्च 2019 रोजी राहत्या घरात अत्याचार केला होता. सदर बालिकेने घडला प्रकार आपल्या आईला सांगिल्यावर आईने पोलिसात फिर्याद दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी पुरेसे पुरावे गोळा करीत जळगांव जिल्हा न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.

29 नोव्हेंबर 2019 रोजी या खटल्याच्या सुनावणीस जळगांव न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती. या खटल्यात दहा साक्षीदार तसेच पीडित बालिकेची साक्ष ही न्यायालयात घेण्यात आली होती. न्यायालयात साक्ष देतांना पीडित बालिकेने न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे दिली आणि आरोपीच्या वकिलांनी तिला विचारलेले प्रश्न ही तिने खोडून काढले. या घटनेत पीडित मुलीने आत्मविश्वास पूर्वक दिलेली साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरत न्यायाधीश आर जे कटारिया यांनी आरोपी किशोर भोई याला मरेपर्यंच जन्मठेप आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सरकारी वकील केतन ढाके यांना या खटल्यात काम करताना तीन वर्षांच्या मुलीकडून साक्ष मिळविणे मोठे अवघड काम होते. मात्र तिने दिलेली साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली आहे. या निकालामुळे अशा प्रकारचे गुन्हे कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत